PHP Error Message

Warning: include() [function.include]: open_basedir restriction in effect. File(/usr/local/apache/htdocs/includes/left_marathi.php) is not within the allowed path(s): (/home/:/usr/lib/php:/tmp) in /home/a9619597/public_html/marathi/history/geographical_location_marathi.php on line 14


PHP Error Message

Warning: include(/usr/local/apache/htdocs/includes/left_marathi.php) [function.include]: failed to open stream: Operation not permitted in /home/a9619597/public_html/marathi/history/geographical_location_marathi.php on line 14


PHP Error Message

Warning: include() [function.include]: Failed opening '/usr/local/apache/htdocs/includes/left_marathi.php' for inclusion (include_path='.:/usr/lib/php:/usr/local/lib/php') in /home/a9619597/public_html/marathi/history/geographical_location_marathi.php on line 14

भौगोलिक स्थान
स्थान दर्शक नकाशा
स्थान दर्शक नकाशा
सातारा जिल्ह्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे पाटणकडे गेलेल्या सह्याद्रीच्या मुख्य रांगेवरील प्रतापगड हा उत्तर दिशेचा पहिला किल्ला आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर ह्या कोकणाकडे जाणार्‍या आंबेनळी घाटाच्या रस्त्याशेजारी प्रतापगड आहे. सातारा-वाई-महाबळेश्वर आणि सातारा-मेढा-महाबळेश्वर असे दोन रस्ते आहेत. मुंबई गोवा मार्गावरील पोलादपूर पासून महाबळेश्वरकडे रस्ता गेलेला आहे. महाबळेश्वर प्रतापगड अंतर रस्त्याने २० किलोमीटर असून पोलादपूर प्रतापगड अंतर २४ कि.मी. आहे. प्रतापगड १७ी ५६' १०'' अक्षांश व ७३ी ३४' ३९'' रेखांशावर आहे. प्रतापगडाची समुद्रसपाटीपासून उंची १०८० मीटर आहे. महाबळेश्वर प्रतापगडाहून ३४७ मीटर उंच असून समुद्र सपाटीपासून १४२७ मीटर उंच आहे. प्रतापगडाचा परिसर अग्निजन्य ज्वालामुखी खडकांच्या थरांच्या स्वरूपाचा आहे. ह्यातील मुख्य प्रकार बेसॉल्ट खडकाचा आहे. ह्या भूरूपाला डेक्कन ट्रॅप म्हणून ओळखले जाते.

तुलनेने कमी टणक असलेला काळा दगड, मुरमाड माती व लाहनमोठे गोटे हे प्रामुख्याने ह्या परिसरात आहेत. प्रतापगडाचा खडक देशावर (सातारा, कोल्हापूरचा घाटमाथ्यापलीकडील भाग) मिळणार्‍या काळया पाषाणापेक्षा कमी टणक आहे. त्यातच प्रचंड पावसामुळे ह्या दगडाची झीज तुलनेने अधिक होते. वातावरणाच्या विदरण प्रक्रियेने विशिष्ट प्रकारची झीज होऊन गोल आकाराचे लालसर रंगाच्या कवचाने युक्त लहानमोठे धोंडे तयार होतात. ह्याला गोल अपक्षय (डहिशीळेवळलरश्र ुशरींहशीळपस) म्हणतात. हे धोंडे थेट बांधकामासाठी, बांधकामात भर म्हणून किंवा मोठ्या आकाराचे धोंडे फोडून मिळालेला दगड ह्या परिसरात बांधकामासाठी वापरलेला दिसतो. प्रतापगडाच्या बांधकामातही हे धोंडे वापरलेले आहेत. शिवाय गडावर तलाव खोदून निघालेला, जागा सपाट करताना निघालेला, कडे तासून मिळालेला किंवा टेकाडे फोडून काढलेला दगड बांधकामासाठी वापरलेला आहे. हे दगड फोडल्यानंतर वातावरणाला उघडे पडताच त्यांची झीज चालू होते. त्यामुळे गडाचे बांधकामाचे दगड सध्या झिजलेल्या अवस्थेत दिसतात.

महाबळेश्वरचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६००० मि. मी. आहे. प्रतापगडावर त्यामानाने थोडा कमी पाऊस होतो. महाबळेश्वर अधिक उंच असल्याने व झाडी भरपूर असल्याने थंड असते. प्रतापगडावर तुलेनेने झाडी कमी आहेत. शिवाय प्रतापगडाचा डोंगर मुख्य रांगेपासून सुटावलेला आहे. तीन बाजूंनी सह्याद्रीची मुख्य उंच रांग व चौथ्या बाजूस कोकणाचा उतार असल्याने महाबळेश्वरपेक्षा गडाचे तापमान थोडे जास्त असते. साधारणत: जून ते सप्टेंबर - पावसाळा, ऑक्टोबर - कोरडे व उष्ण हवामान, नोव्हेंबर ते जानेवारी - हिवाळा, फेब्रुवारी ते मे - उन्हाळा असे हवामान असते. प्रतापगडाच्या तीन बाजूंच्या दर्‍या जंगलव्याप्त असून पश्चिम आणि उत्तर दिशांच्यामध्ये ७००-८०० फूट उंचीचे कडे व नंतर तीव्र उताराची जमीन आहे.

दाट जंगल व सह्याद्रीच्या कडेकपारींमुळे इथले वन्यजीवन समृद्ध आहे. सह्याद्रीच्या सदाहरीत जंगलपट्ट्यात हा भाग येतो. नाणा, अंजन, उंबर, किंजळ, हिरडा, फणस, साग, बांबू, आंबा, ऐन असे वृक्ष, अनेक फुलझाडे, दुर्मिळ व औषधी वनस्पती, वेली, काटेरी झुडपे ह्यांनी प्रतापगडाजवळचे जंगल समृद्ध आहे. विविध पक्षी, फुलपाखरे, सर्प, कीटक यांच्याबरोबरच वन्यप्राण्यांमध्ये ह्या परिसरात बिबळया वाघ, अस्वल, सांबर, चितळ, भेकर, गवा, कोल्हा, वानर, उदमांजर, माकड, रानमांजर, तरस, हरीण, लांडगे यांचा समावेश होतो.

आपण प्रतापगड बनवू तसा । शिवकाळात, वैभवात होता जसा ।।
जय भवानी । जय शिवराय ।।